भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातवाला आणि त्याच्याकडून या सनया विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे. याबाबत विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक केली आहे. नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते.