लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपाने शिवसेनेला डेडलाइन दिली आहे. भाजपाने 31 जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपा शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. शिवसेनेकडून वारंवार टीका होत असतानाही भाजपाने मात्र सबुरीची भूमिका घेतली होती. पण अखेर भाजपाने आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच शिवसेनेच्या निर्णयाची ठराविक वेळेपर्यंतच वाट पाहू असंही सांगितलं.