Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 10 January 2025
webdunia

भाजपने रचला मोठा विक्रम, आठ दिवसांत सदस्यत्व मोहिमेने दोन कोटींचा आकडा केला पार

भाजपने रचला मोठा विक्रम, आठ दिवसांत सदस्यत्व मोहिमेने दोन कोटींचा आकडा केला पार
, बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (10:01 IST)
भाजपने सदस्यत्व मोहीम सुरू केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच पक्षाची सदस्यसंख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे पहिले सदस्य बनून भाजपच्या राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाची सुरुवात केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांनी नऊ राज्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या व सदस्यत्व मोहिमेचा आढावा घेतला.
 
या बैठकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस, सदस्यत्व प्रमुख आणि सदस्यत्व संघाचे अधिकारी सहभागी झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप अध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीला झालेल्या अपघातप्रकरणी चालकाला जामीन