Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगाल बंद दरम्यान भाटपारा येथे भाजप नेत्यावर गोळीबार, एक जखमी

bengal band
, बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (11:36 IST)
आज पश्चिम बंगालमधील राज्य सचिवालयावर मोर्चा काढत आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने 12तासांच्या बंदची हाक दिली आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्त्ये एकमेकांशी भिडले. भाटपारा येथे बंगाल बंद दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेतावर गोळीबार केल्याचा आरोप भाजपनेते अर्जुनसिंह यांनी केला आहे. या गोळीबारात कार मधून प्रवास करणारा एक भाजप समर्थक जखमी झाला आहे. बंद मुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. राजधानी कोलकातामध्ये सकाळपासूनच रस्त्यांवर गर्दी कमी आहे. रस्त्यांवर फार कमी बसेस, रिक्षा, टॅक्सी दिसतात. खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. मात्र, बाजारपेठा आणि दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू आहेत पण बहुतांश खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे कारण त्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुगळी स्थानकावर लोकल ट्रेन अडवली. रस्त्यावर आंदोलन केले. मालदा येथे रस्ता जाम करण्यावरून टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांना जमावाला पांगवावे लागले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या राजीनामाची मागणी करत घोषणाबाजी केली. 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र: काँग्रेस सदस्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोन भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल