येत्या 25 ते 28 मे या दरम्यान भाजप राज्यातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणारी संवाद यातत्रा काढत आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती भाजपकडून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद–पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदानही करणार आहेत. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या अभूतपूर्व शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.