Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का

काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का
काळापैसा धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारने काही नवीन निर्णय जाहीर केले आहेत. यात मुदत ठेवी आणि बचत खाती सोडून सर्व खात्यांसाठी पॅनकार्ड किंवा फॉर्म नंबर 60 देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे.

याशिवाय ज्या खात्यांवर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे, अशा खात्यांचा तपशीलही बँका आणि पोस्टाकडून आयकर विभागाने मागितला आहे. अशा खात्यांच्या 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबरपर्यंतच्या व्यवहारांची माहितीही मागवण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत ही माहिती देणं बंधनकारक असणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अबब, तब्बल १४ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप संदेशाने झाले नववर्षाचे स्वागत