नवी दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
इस्रायली दूतावासाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, 'दिल्ली पोलीस आणि सुरक्षा टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.'
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, इस्रायली अधिकारी आपल्या भारतीय समकक्षांसह दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या कारणांच्या तपासामध्ये सहकार्य करत आहे.
या स्फोटांमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचंही इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्फोटाचा फोन मिळताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. टीव्ही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. हा नेमका स्फोट नेमका कोणता आणि यामागे कोणाचा हात आहे, याबाबत सध्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांना स्फोटाचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर एका झाडाजवळून धूर येत होता.
दिल्ली अग्निशमन सेवा संचालक अतुल गर्ग यांनी चाणक्य पुरी येथील इस्रायली दूतावासाजवळ पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. चौकशीअंती त्यांनी सांगितले की, येथे अद्याप काहीही आढळले नाही. दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.47 वाजता कॉल आला होता जो दिल्ली पोलिसांच्या पीसीआरमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्यांना घटनास्थळाजवळ एक पत्र सापडले आहे.