rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लखनऊ : ब्लू व्हेल गेमचा आणखीन एक बळी

blue whale game
, शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (17:02 IST)

लखनऊमधील इंदिरानगरमध्ये राहणा-या १३ वर्षीय आदित्य वर्धन उर्फ केशव सिंह या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्मतहत्या केली. त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून तो आपल्या आईच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होता. यामुळे त्याने ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

रूपेश सिंह हा मागील काही दिवसांपासून मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होता. रोज संध्याकाळी तो आईकडून मोबाईल घेऊन घराच्या वरच्या मजल्यावर दोन तास गेम खेळत होता. यामुळे त्याची मानसिक आवस्था बदलली होती असे त्यांचया कुटुंबियांनी सांगितले. या गेममुळेच त्याने गुरुवारी खोलीतील पंख्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचेही त्यांनी सांगितले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अपघातामध्ये सोलापुरातील सहा जण ठार