Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘द ब्लू व्हेल’ गेम : फेसबुक, गुगलने प्रतिज्ञापत्रात सादर करावे

‘द ब्लू व्हेल’ गेम : फेसबुक, गुगलने प्रतिज्ञापत्रात सादर करावे
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:21 IST)

‘द ब्लू व्हेल’ गेमवर झालेल्या सुनावणीत, फेसबुक आणि गुगल दोन्ही कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्रतिवादींना पाठवलेली नोटीस फेसबुक आणि गुगलच्या भारतातील पत्त्यांवर मिळाली असल्याने उत्तर देण्यास दोन्ही कंपन्यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुक आणि गुगल दोघांनाही फटकारलं. “इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाहीत” त्यामुळे आपण लवकरात लवकर आपलं उत्तर सादर करा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

जीवघेणा ऑनलाईन गेम ‘द ब्लू व्हेल’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उ.प्र. : यमुना नदीत बोट बुडून १५ जणांचा मृत्यू