दुचाकी वाहने हेल्मेट लावून चालवा असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. तसे न करणाऱ्यांसाठी दंडाचे प्रावधान देखील आहे. तरी ही काही लोक हेल्मेट न लावता वाहने भरधाव वेगाने चालवतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
सध्या रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा छंद सगळ्यांनाच लागला आहे. रिल्स साठी लोक काहीही करतात आणि आपला आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात.
देशाची राजधानी दिल्ली मध्ये रिल्स बनवण्यासाठी एक नवरी स्कुटी वर हेलमेट न लावता फिरत आहे. असे करणे तिला चांगलेच भोवले आहे. दिल्ली पोलिसांची नजर तिच्यावर पडली आणि दिल्ली पोलिसांनी तिच्या कडून चक्क 5000 रुपयांचा दंड आकाराला आहे. तसेच लोकांना संदेश देण्यासाठी या महिलेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये एक महिला नवरीच्या वेशात असून वेगाने स्कुटी चालवत आहे. मागे बॅकग्राऊंडला सजनाजी वारी वारी जाऊ हे गाणे वाजत आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिट केले आणि एक संदेश दिला आहे.
पोलिसांनी या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे की, ''रस्त्यावर रिल्स तयार करणे तुमच्यासाठी आणि इतरांसाठी धोकादायक आहे.असा मूर्खपणा कोणीही करू नये सुरक्षितपणे वाहन चालवा.
पोलिसांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहे. काहींनी या महिलेला शिक्षा देण्यास म्हटले आहे. तर एकाने संदेश देण्यासाठी चांगली युक्ती शोधली आहे म्हणत पोलिसांचे कौतुक केले आहे.