Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले

भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले
, शनिवार, 20 जून 2020 (16:25 IST)
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.
 
१९ बटालियनच्या बीएसएफची एक टीम गस्त घालीत होती. यावेळी हिरानगर सेक्टरमधील रथुआ भागात पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटे ५.१० वाजता बीएसएफच्या सीमा चौकीच्या पानसरजवळ एक पाकिस्तानी गुप्तचर ड्रोन उडताना दिसले. ड्रोनचा मागोवा घेतल्यानंतर उपनिरीक्षक देवेंदरसिंह यांनी त्यावर नऊ एमएम बॅरेटच्या आठ राउंड गोळ्या झाडल्या आणि हे ड्रोन खाली पाडले. सीमा चौकी पानसरजवळ हे ड्रोन खाली पाडण्यात भारतीय जवानांना यश आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह