Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

लाल मुंगीच्या चटणीने कोरोनावर उपचार?

Corona treatment with red ant chutney
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (19:51 IST)
कोरोनाच्या उपचारांसाठी लाल मुंगीची चटणी वापरण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशभरात कोविड -19 च्या उपचारासाठी पारंपारिक औषध किंवा घरगुती उपायांचा वापर करण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी याचिका फेटाळून लावली.
 
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाले, "बघा, बरीच पारंपारिक औषधं आहेत, अगदी आमच्या घरातही पारंपारिक औषधोपचार केला जातो. तुम्हाला या उपचारांचे परिणामही भोगावे लागतात, परंतु आम्ही हे पारंपारिक औषध देशभरात अवलंब करण्यास सांगू शकत नाही.
 
ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला ओडिशा हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी लाल मुंग्यांच्या  चटणीचा वापर कोविड -19 विषाणूवर (Covid -19 ) केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत आहेत. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर हायकोर्टाने याचिका फेटाळाली.ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. पण आता सुप्रीम कोर्टानेसुद्धा याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.
 
'लाल मुंगीची चटणी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे'
याचिकेत म्हटले आहे की, लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण करून बनवलेली चटणी ओडिशा आणि छत्तीसगडसह देशातील आदिवासी भागात ताप, खोकला, सर्दी, थकवा, श्वसनाच्या समस्या आणि इतर आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. लाल मुंगीची चटणी औषधी गुणांनी समृद्ध आहे आणि त्यात फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि झिंक आहे आणि कोविड -19 च्या उपचारांमध्ये त्याची प्रभावीता तपासण्याची गरज आहे असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत दिल्लीच्या 'निर्भया' हत्याकांडाची पुनरावृत्ती