काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईमधील घरावर सीबीआयने मंगळवारी सकाळी छापा टाकला.
सीबीआयची टीम सकाळी सात वाजता त्यांच्या घरात दाखल झाली होती. सीबीआयने एकूण 16 ठिकाणी छापा टाकला. मात्र सीबीआयने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. INX मीडियाला दिलेल्या मंजुरीबाबत ही छापेमारी करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर INX कंपनीला झुकतं माप देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे.