केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. ४ मे ते १० जून या कालावधीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.
हे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी cbse.nic.in आणि cbsc.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकाची घोषणा केली आहे.