Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द
, गुरूवार, 25 जून 2020 (15:49 IST)
राज्यातील शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. सीबीएसई बोर्डान दहावी व बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
ऐन परीक्षेच्या काळात करोनाचा देशात शिरकाव झाल्यानं सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डानं दहावी, बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, देशातील करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्यानं या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

११ वी ऑनलाईन प्रवेश, एसईबीसीसाठी १२ टक्के आरक्षण