Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CBSE Board Result 2019: सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल, या प्रकारे बघू शकता

CBSE Board Result 2019: सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल, या प्रकारे बघू शकता
, गुरूवार, 2 मे 2019 (12:53 IST)
नवी दिल्ली- सीबीएसई बोर्ड रिझल्ट (CBSE Result 2019) 1 वाजता जाहीर केला जाईल. सर्व जोनचे निकाल सोबतच जाहीर करण्यात येतील. CBSE Board 12वी चा निकाल cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर जाहीर होतील. विद्यार्थी या वेबसाइट्सवर विजिट करून निकाल बघू शकतात. निकाल (CBSE Board 10th, 12th Result) बघण्यासाठी रोल नंबर सबमिट करावा लागणार. सीबीएसई बोर्ड तर्फे 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसईच्या वर्ग 10 आणि 12 साठी 31 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. मागील वर्षी 10वी च्या परीक्षेत 86.70 टक्के विद्यार्थी तर 12वी परीक्षेत 83.01 विद्यार्थी यशस्वी ठरले होते.
 
CBSE Board Result 2019 या सोप्या पद्धतीने बघा
 
स्टेप 1: निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in वर विजिट करा.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आपला रोल नंबर भरून सबमिट करा.
स्टेप 4: आता आपण निकाल बघू शकाल.
स्टेप 5: आपण निकाल बघून प्रिंट आऊट देखील काढू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whatsapp मध्ये येणार आहे महत्त्वाचा फीचर, तुम्ही त्यावर सामान खरेदी करू शकता !