संसदेत सर्वच पक्षाचे खासदार एका खास गोष्टीसाठी एकत्र आले आणि त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. निमित्त होतं लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या वाढदिवसाचं. सुमित्रा महाजन यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं संसदेच्या सर्वच सदस्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सत्ताधारी भाजप असो वा विरोधी पक्षातील काँग्रेस असो सर्वच पक्षाच्या खासदारांनी सुमित्रा महाजन यांना शुभेच्छा दिल्या...