Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या कारणामुळे स्थगित करण्यात आली चांद्रयान मोहीम

या कारणामुळे स्थगित करण्यात आली चांद्रयान मोहीम
, सोमवार, 15 जुलै 2019 (13:23 IST)
तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं इस्त्रोने सांगितलं आहे.  
 
आज 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते.
 
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली आहे.
 
इंधन गळतीमुळे थांबवण्यात आलं चांद्रयान
इंधन गळतीमुळे चांद्रयान-2 थांबवण्यात आलं असण्याची शंका इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी केलं आहे.
 
"आपल्या जवळ अद्ययावत यंत्रणा आहे त्यामुळे आपण कुठे बिघाड आहे हे ओळखू शकलो, भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्यापेक्षा त्यावर आधीच उपाय योजना करणं हे केव्हाही चांगलंच. हे मिशन स्थगित करून इस्रोने योग्य निर्णय घेतला आहे.
 
"या तांत्रिक अडचणीचं नेमकं कारण शोधावं लागणार आहे. अशी शंका आहे की गॅस स्टोअरेज सर्किटमध्ये गळती असू शकते. ते नेमकं शोधावं लागणार आहे. दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे त्यानंतरच कळू शकतं," असं माधवन नायर एएनआय या वृत्त संस्थेला सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र काँग्रेस बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक गाजवणार?