rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चार धाम यात्रा हवाई मार्गे सुरु होणार आहे, IRCTC ने आणले हे खास नवीन टूर पॅकेज

Char Dham Yatra will start by air
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (14:46 IST)
चार धामला यात्रेला जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की IRCTC ने त्यांच्यासाठी नवीन खास टूर पॅकेज आणले आहे. IRCTC चार धाम यात्रा हवाई मार्गे काढणार आहे. यंदाची चार धाम यात्रा 3मे 2022 रोजी सुरू होणार आहे. जर तुम्हालाही गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथला जायचे असेल तर IRCTCच्या या खास टूर पॅकेजचा नक्कीच लाभ घ्या, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा त्याच्या ट्विटर हँडलला भेट देऊन तपशील घेऊन बुकिंग करा.
 
IRCTC अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळा(Indian Railway Catering and Tourism Corporation)ने चार धाम यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुन्हा एकदा एक उत्तम टूर पॅकेज जाहीर केले आहे. ज्यांनी आयआरसीटीसीच्या मागील टूर पॅकेजमध्ये बुकिंग करण्याचे राहिले आहे किंवा त्यांना त्या तारखांमध्ये काही समस्या आहेत, त्यांनी IRCTCचा हा नवीन टूर पॅकेज प्लॅन अवश्य पाहावा.
 
या नवीन चार धाम टूर पॅकेजेस योजनेत, IRCTC गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे दर्शन देईल. या 12 दिवस/11 रात्री हवाई टूर पॅकेजचे भाडे रु. 60,500/- प्रति व्यक्ती पासून सुरू होते, निवडण्यासाठी इतर भाडे स्लॅब आहेत. 

webdunia
IRCTC ने या टूर पॅकेजला चार धाम यात्रा असे नाव दिले आहे, (IRCTC चार धाम यात्रा टूर पॅकेजेस) हा दौरा 22 जून रोजी सुरू होईल आणि 12 सप्टेंबर रोजी परत येईल . आपल्याला सोयीस्कर वाटणाऱ्या कोणत्याही तारखेला आपण  बुक करू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IIT मद्रासला कोरोनासाठी स्वस्त उपचार सापडला, सौम्य संसर्गावर इंडोमेथेसिन प्रभावी