Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले

‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले
, बुधवार, 15 मार्च 2017 (17:25 IST)
कौशांबी जिल्ह्यात भारतीय वायुदलाचं ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले आहे. इंजिनमधील बिघाडामुळे उड्डाण घेताच काही वेळात अलाहाबाद-कौशांबी सीमेवर ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरुप आहेत. वायुदलाचं चेतक हेलिकॉप्टर बमरौलीहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, लँडिंगआधीच क्रॅश होऊन हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं. वायुदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वायुदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकार दीड हजार कोटींची तूर खरेदी करणार