Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यामुळे उत्तर भारतीयांच्या छटपूजेला मुंबई मनपाकडून बंदी

यामुळे उत्तर भारतीयांच्या छटपूजेला मुंबई मनपाकडून बंदी
, बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (08:34 IST)
देशातील विविध भागात साजरे होणारे सण हे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठ्या उत्साहानेसाजरे होतात. यामध्ये प्रमुखपणे उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण देखील यापैकी एक आहे. येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक २० व २१ नोव्हेंबर २०२० रोजी हा सण येत आहे. 
 
या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र यंदा ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येणाची असलेली शक्यता लक्षात घेऊन, तसेच समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी छटपूजा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास शारीरिक अंतराचे पालन योग्य प्रकारे होईल, असे वाटत नाही. यामुळे छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणा-या आयोजनांवर नाईलाजाने प्रतिबंध घालण्यात येत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार उत्तर महाराष्ट्र दौरा करणार नाही, हे आहे कारण