Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनावट पासपोर्ट प्रकरण: छोटा राजनसह चौघांना सात वर्ष कारावास

बनावट पासपोर्ट प्रकरण: छोटा राजनसह चौघांना सात वर्ष कारावास
बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह चौघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ठोठावली आहे. या प्रकरणी छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल आणि ललिता लक्ष्मणन यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनविणे असे आरोपपत्र दाखल केले होते.

यात चौघांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर  झालेल्या सुनावणीत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 15, 000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. छोटा राजन याच्यावर भारतात दहशतवादी कृत्य, खून, अपहरण, तस्करी अशाप्रकारचे  85 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत मोदी मॅजिक