Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PM मोदींच्या वाढदिवसाला जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

Modi
, शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (10:42 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी विविध तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या तामिळनाडू युनिटने विशेष व्यवस्था केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दिवशी 720 किलो मासळीचे वाटप करण्याचीही योजना आहे. 
 
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तामिळनाडू युनिटने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या आणि 'बेबी किट्स' भेट देण्यासह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे.
 
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. प्रत्येक अंगठीचे वजन सुमारे दोन ग्रॅम तर किंमत 5000 रुपये असेल. केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन रोयापुरम येथील RSRM रुग्णालयात लाभार्थ्यांना सोन्याच्या अंगठीसह 'बेबी किट' भेट देतील.
 
मंत्री एल मुरुगन म्हणाले, 720 किलो मासे वाटण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. मोदींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त ते कोलाथूर विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 750 किलो मासळीचे वाटप करणार आहेत. यामागे उद्धेश्य  प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देणे आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Essay on Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निबंध