Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेशनिंग दुकानात रॉकेलला आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू

रेशनिंग दुकानात रॉकेलला आग,  15 जणांचा होरपळून मृत्यू
, शनिवार, 22 एप्रिल 2017 (08:43 IST)

मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे रेशनिंग दुकानात रॉकेलला आग लागल्यानं 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वाटप सुरु होतं. यावेळी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणाता रांगा लागल्या होत्या. ज्या खोलीत रॉकेलचा साठा करण्यात आला होता तिथे देखील 50 ते 60 जण दाटीवाटीनं उभे होते. याचवेळी तिथं अचानक आग भडकली. अचानक आग लागल्यानं एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण गदारोळात अनेक जण आतच अडकले. त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर आगी मागच कारण समजू शकलेले नाही.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुब्रतो रॉय यांना दिलासा , अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द