सिमी या आतंकवादी संघटनेच्या आणि भोपाळ सेंट्रल जेलच्या कैदेतून पळालेल्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी त्यांचा अपठ्लागा केला आणि भोपाळ सेंट्रल जेलपासून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अचारपुरा गावात मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत दहशतवाद्यांना ठार
केले.याकामगिरीनेदेशात पोलिसांचे कौतुक होत आहे.
जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना पोलिसांनी आधी घेरलं मग त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले होते. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
सिमीचे 8 दहशतवादी रात्री साडेतीनच्या सुमारास भोपाळ सेंट्रल जेलमधून पळाले होते. यावेळी त्यांनी जेलमधील सुरक्षारक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली आणि चादरीची रस्सी बनवून जेलची भिंत ओलांडली होती.
दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आपली कारवाई केलीच आहे. यामध्ये पोलिसांनवर हि गोळीबार झाला होता, त्यामुळे पोलिसांना के कारवाईचे हत्यार उगरावे लागले आहे.