Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात नागरिकांनी कुटुंबासह लुटला चंद्रयान लँडिंगचा आनंद

राज्यात  नागरिकांनी कुटुंबासह लुटला चंद्रयान लँडिंगचा आनंद
, बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (20:17 IST)
आज भारतीय  वैज्ञानिकांनी चांदोबाला मिठी मारली. घराघरात टीव्हीवर या अनमोल क्षणाचे साक्षीदार अनेक कुटुंब झाले.
 
भारतीय वैज्ञानिकांनी 14 जुलै रोजी चंद्रयान-3 मोहिम सुरू केली. 22 जुलै 2019 चा कडू अनुभव समोर असतांना  भारतीय वैज्ञानिकांनी मोठ्या जिद्दीने व अभ्यासकवृत्ती ने तयारी करून मोहिमेला सुरवात केली. सुमारे41 दिवसाच्या प्रदीर्घ काळात या यानाने चंद्रमा वर भारताचा झेंडा यशस्वीपणे फडकवला.
 
या मोहिमीची सर्व सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. सकाळ पासून या मोहिमेचे ठिकठिकाणी चर्चा दिसून येत होती. आज सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यान चांद्रवर उतरणार यासाठी अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाठी थेट प्रक्षेपण ठेवण्यात आले होते. कामगारांनी कामावरून लवकर सुट्टी घेत सहकुटुंब टीव्हीसमोर चंद्रयान मोहिमेचा आनंद घेतला आणि अगदी सहा वाजून चार मिनिटांनी "यान लँड" झाले आणि नागरिकांचा काळजाचा ठोका चुकला. सर्वांनी टाळ्या वाजवून या मोहिमेचे स्वागत करीत भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. वाड्या वस्त्या मध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला गेला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

VIDEO : चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग, नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुखांना फोन करून म्हटलं...