Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईल वाचविण्याचा नादात सिमेंट ट्रकवरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू

death
, गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:55 IST)
धावत्या वाहनातून पडल्याने परप्रांतीय क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील शिवपॅलेस मंगल कार्यालय भागात घडली. मोबाईल वाचविण्याच्या नादात ही घटना घडली असून या घटनेत तरूणाच्या डोक्यावरून मालट्रकचे चाक गेल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिमेंट मिक्सर ट्रकवरील चालकाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत आणि चालक सख्खे भाऊ आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन विजय चौधरी (रा.उत्तरप्रदेश) असे मृत क्लिनरचे नाव आहे. राजन चौधरी हा क्लिनर बुधवारी (दि.१३) रात्री भाऊ साजन विजय चौधरी याच्या समवेत एमएच १५ एचएच ००८३ हा सिमेंट टी.एन. मिक्सर मालट्रक नाशिक येथून आशेवाडीच्या दिशेने घेवून जात असतांना ही घटना घडली. साजन चालवित असलेल्या ट्रकमध्ये राजन क्लिनर साईडच्या कॅबीन मध्ये बसलेला होता. अचानक हातातील मोबाईल रस्त्यावर पडल्याने तो धावत्या वाहनातून मोबाईल उचलण्याचा प्रयत्न करी असतांना हा अपघात झाला. अचानक क्लिनरसाईडचा छोटा दरवाजा उघडला गेल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत त्याच्या डोक्यावरून मागील चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी जितेंद्र पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक साजन चौधरी याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्भवती महिलेची टॉयलेटमध्ये प्रसूती, कमोडमध्ये अडकले बाळ, 25 मिनिटांत बाळाची सुटका केली