अयोध्येतील भदरसा येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून योगी सरकार ने शुक्रवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईशी भेट घेतली. त्यांनतर त्यांनी मोठी कारवाई करत कलंदर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि भदरसा पोलीस ठाण्याचे प्रभारींना बडतर्फ केले आहे. तत्काळ कारवाई न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय मुख्य आरोपी मोईद खानच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महसूल विभागाने जमिनीचे मोजमाप सुरू केले आहे. मोईद यांचा तलाव आणि सरकारी जमिनींवर अवैध कब्जा असल्याचा आरोप आहे.
अयोध्येत सपा नेते मोईद खान यांच्यावर अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने दोन महिने तिच्यावर बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे समजले. नंतर त्यांना सर्व प्रकार कळल्यावर कुटुंबीयांनी पीडितेला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी केली आहे.