Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदसौर मधील स्थिती नियंत्रणात

मंदसौर मधील स्थिती नियंत्रणात
मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या मंदसौर मध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला असून तेथे जमावबंदीचा आदेश आणि पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने तेथील स्थिती आता नियंत्रणात आली आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
 
या जिल्ह्यातील दूध आणि भाजीपाला पुरवठा पुर्ववत करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व एटीएमही सुरळीत करण्यात आली आहेत असे सांगण्यात येते. दरम्यान या भागातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पक्षाचे एक शिष्टमंडळ येथे भेट देणार होते पण त्यांना त्यासाठी पोलिसांनी अनुमती नाकारली. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाने भगवंत मान, आशुतोष आणि संजयसिंह या नेत्यांचे शिष्टमंडळ तिकडे पाठवले आहे. तथापी त्यांनी जमावबंदीचा आदेश मोडून त्या जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटक केली जाईल असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिला.
 
दरम्यान पोलिसांनी जाळपोळ आणि हिंसक प्रकार केल्याच्या आरोपावरून 156 जणांना अटक केली आहे. काल भरात या जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे जिल्हाधिकारी ओ. पी. श्रीवास्तव यांनी सांगितले. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अजूनही पुर्ववत करण्यात आलेली नाही. ती पुर्ववत होण्यास वेळ लागेल असे त्यांनी नमूद केले. हिंसाचाराच्या काळात अफवा पसरू नयेत म्हणून मोबाईल संपर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘Nokia 3’चे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात लाँच होणार