केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला तिसरा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा रुग्ण आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी दिली. भारतातील कोरोना विषाणूचा हा तिसरा रुग्ण आहे. याआधी कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण केरळमधीलच आहेत.
तिसऱ्या रुग्णावर कासारगोडमधील कांजनगड जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अलीकडेच हा रुग्ण चीनच्या वुहान शहरातून परतला होता. केरळच्या वेगवेगळया रुग्णालयात दोन हजार रुग्णांना ऑब्जर्व्हेशन खाली ठेवण्यात आले आहे.