कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येक वर्गातील लोकं खूप अस्वस्थ आहेत. त्याचबरोबर देशात लॉकडाऊनमुळे हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. मात्र अनलॉकमध्ये थोडी फार मुभा देण्यात आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्यात उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये एक अजब प्रकार घडला. क्वारंटाइन सेंटरमध्ये 28 दिवसांत 84 डॉक्टरांच्या जेवणाचे बिल तब्बल 50 लाख आले आहे. अतिरिक्त वैद्यकीय मुख्य सचिव डॉ रजनीश दुबे यांना हे बिल पाहून धक्का बसला आहे. दुसरीकडे प्रशासनाने हे बिल भरण्यास नकार दिला आहे.
हॉटेल चालकांचे म्हणणे आहे की विजेच्या बिलापासून ते हॉटेलचे कर्मचारी नियमित पगार देत आहेत. आता शहरातील चार हॉटेल्स जिल्हा प्रशासनाद्वारे पाम ट्री डेव्हलपमेंट हॉटेलमार्फत उघडण्यात आली आहेत. ज्यामध्ये कोरोना योद्धा म्हणजेच डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरातील चार हॉटेलमध्ये 84 डॉक्टरांना 28 दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने मार्चपासून कोणत्याही हॉटेल चालकाला थकबाकी दिली नाही आहे.
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मानव महाजन यांनी सांगितले की, 50 लाख रुपयांची थकबाकी असून जिल्हा प्रशासनाने मार्चपासून पैसे भरले नाही आहेत. थकबाकी लवकरात लवकर न मिळाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहू आणि आवश्यक झाल्यास आम्ही बैठकही करू. दुसरीकडे जिल्हा प्रशासनामार्फत डॉ रजनीश दुबे हे हॉटेल असोसिएशनशी चर्चा करणार आहेत.
या विषयावर अलिगडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भानु प्रतापसिंह कल्याणी यांनी, '50 लाख रुपये तर नाही आहे पण जे काही आहे, हा मुद्दा प्रधान सचिवांच्या बैठकीतही समोर आला, मग ते म्हणाले की पैशाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. सरकार त्यात काहीही करु शकणार नाही.