उत्तरप्रदेशमध्ये रुग्णवाहिका नाकारल्याने मुलांना वडिलांचा मृतदेह सायकल रिक्षातून ढकलत न्यावा लागला. विशेष म्हणजे वडिलांना अशाप्रकारे नेणारा मुलगा दिव्यांग आहे. गावातील आरोग्यकेंद्राकडून मृतदेह आणण्यासाठी कोणतीही मदत करण्यात न आल्याने त्यांना हा पर्याय स्विकारावा लागला. या मुलांनी आपल्या घरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिवेदीगंज कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये मृतदेह नेला.
याबाबत आरोग्य केंद्रातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. चंद्रा यांना विचारले असता, त्यांनी पूर्ण जिल्ह्यासाठी आपल्याकडे केवळ मृतदेह वाहून नेणाऱ्या केवळ दोन गाड्या आहेत. मात्र त्यावेळी त्या दोन्ही गाड्या उपलब्ध नसल्याने आपण सेवा देऊ शकलो नाही. याबरोबरच रुग्णवाहिकेतून मृतदेह आणता येत नाही असेही ते सांगितले.