लखनौच्या काकोरी येथील हाता हजरत साहेब परिसरात मंगळवारी रात्री एका दुमजली इमारतीला आग लागली. आग लागताच सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. सिलिंडरमधील आग आणि स्फोट इतका भीषण होता की खोलीचे छत आणि भिंती कोसळल्या. लोकांना स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू येत होते
या अपघातात जरदोजी कारागीर मुशीर(50) हुस्ना बानो (45), भाची रैया (७), हुमा (४), हिना(2) हे मृत्युमुखी झाले आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे .जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शॉर्ट सर्किट मुळे अपघात झाल्याचे सांगत आहेत.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि अग्निशमन दलाची गाडी देखील पोहोचली. पोलिसांनी वीज विभागाला माहिती देऊन वीज बंद केली. घरात अडकलेल्या लोकांची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. मुशीरच्या लग्नाचा वाढदिवस त्या दिवशी होता त्याने आपल्या घरी मेहुणा आणि त्याचे तीन मुलांना देखील बोलावले होते. मुशीर आपल्या भावांसह राहायचा .
मुशीर हा दुसऱ्या मजल्यावर रहायचा.त्याच्या घरात जरदोजीचा कारखाना देखल होता. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वीच बोर्ड जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. घरात दोन सिलिंडर होते त्यात स्फोट झाल्यामुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्न करावे लागले.