Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

दलित तरुणाचे कथितरित्या ऑनर किलिंग

Dalit youth allegedly kills Honor
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (11:11 IST)
दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधल्या हरदोईमध्ये घडली आहे.  
 
ही माहिती समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या मृत तरुणाच्या आईचाही मृत्यू झाला. हा प्रकार ऑनल किलिंगचा असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
 
अभिषेक उर्फ मोनू (वय २०) असं मृत तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील भाडेसा भागात राहत होता. त्याचे त्याच भागातील एका तरुणीशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
 
संबंधित तरुणीला भेटून घरी जात असताना तिच्या नातेवाइकांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून वाद वाढला आणि मुलीच्या नातेवाइकांनी त्याला एका घरात डांबले आणि घरावर रॉकेल टाकून आग लावली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरेगाव-भीमा प्रकरण : भिडेंविरोधातील तपासासाठी न्यायालयाची मुदतवाढ