पालघर जिल्ह्या हा मागील तीन महिन्यांपासून भूकंप नोंदवला जात आहे. तशातच पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. डहाणू, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले असून हा भूकंप ३.३ रिश्टर स्केल इतका तीव्रता नोंदविण्यात आला आहे. मागील काही दिवसात परिसरात सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांच्या मनात जबरदस्त भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या हादऱ्याने भयभीत होऊन काही रहिवाशांनी घरेदेखील सोडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सरकारला याची दखल घेणे गरेजेचे झाले आहे. मागील आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे नोंदवले गेले होते. यामध्ये एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू देखील झाला आहे. मग तेव्हा प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवले आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नेये म्हणून कठोर उपाय करणे गरजेचे आहे.