मध्य प्रदेशच्या दमोह येथे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून विना सीरियल नंबरच्या 500च्या नोटा निघाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी दमोहमध्ये नारायण अहिरवार नावाच्या एका शिक्षकाने एटीएममधून 1000 रूपये काढले.
एटीएममधून आलेल्या 500 च्या दोन नोटांवर सीरियल नंबरच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर अन्य लोकांनी पैसे काढले असता तशाच नोटा एटीएममधून बाहेर आल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एटीएम बंद करण्यात आलं आहे. याशिवाय नोटांच्या सत्यतेबद्दल पडताळणी सुरू आहे. यापुर्वी नवी दिल्लीच्या एका एटीएममधून 6 फेब्रुवारीला खेळण्यातल्या नोटा निघाल्या होत्या. त्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.