Publish Date: Sat, 24 Dec 2016 (10:26 IST)
Updated Date: Sat, 24 Dec 2016 (10:28 IST)
हो युपी मध्ये आता दंगल कर मुक्त आहे. अभिनेता आमिरने तशी मागणी केली होती. त्यामुळे अभिनेता आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. देशभरात आज आमीरचा ‘दंगल’ सिनेमा रिलीज झाला आहे.‘दंगल’ टॅक्स फ्री केल्यामुळे तिकीटाचे दर राज्यभर स्वस्त होतील. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमा पाहता येईल असे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.