ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना समाविष्ट केले आहे. त्यामुळे दाऊदच्या मालमत्तांची लवकरच जप्ती होण्याची शक्यता आहे. दाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांचा तसेच त्याच्या 21 उपनावांचाही उल्लेख ब्रिटनच्या यादीत करण्यात आला आहे.
ब्रिटनकडे उपलब्ध असलेली दाऊदची 21 उपनावे
दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा ब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे समावेश आहे. यामध्ये अब्दुल शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, फारुकी, शेख, हसन कासकर, मेमन, दाऊद, हाजी सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.