Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

एअरटेलच्या कार्यालयावर भर दिवसा दरोडा

Daytime robbery at Airtel officeएअरटेलच्या कार्यालयावर भर दिवसा दरोडा Marathi National News  In Webdunia Marathi
, शनिवार, 12 मार्च 2022 (20:48 IST)
बिहारच्या सीतामढी शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या मोहल्ला जयप्रकाशपथयेथे असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार अमित कुमार टुना यांच्या निवासस्थानासमोरील एअरटेल कार्यालय आणि सीए कार्यालयात घुसून गुन्हेगारांनी भरदिवसा दरोडा टाकला. दोन दुचाकीवर स्वार होऊन 5 गुन्हेगारांनी हीघटना घडवून आणली.  
 
जयप्रकाश मार्गा वर असलेल्या वरुण सिंहच्या घरात सीए आणि एअरटेल कंपनीचे कार्यालय चालते. शुक्रवारी दुपारी सशस्त्र गुन्हेगारांनी सदर घरात घुसून पिस्तुलाच्या बटाने मारहाण करून दोन्ही कार्यालयातील ऑपरेटरचे डोके फोडले. त्याचवेळी एअरटेल कार्यालयातून जमा झालेले 20 हजार रुपये आणि सीए कार्यालयातील कर्मचाऱ्याची पर्स हिसकावून ते फरार झाले. या पर्समध्ये चार हजार रुपये होते.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मेहसौल पोलीस रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जखमी एअरटेल ऑफिसचे ऑपरेटर आणि सीए यांच्यावर सदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
पोलीस दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. यासंदर्भात डीएसपी रमाकांत उपाध्याय म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मानसिक आरोग्य : शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय? या 3 गोष्टी करून पाहा