Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा - कोर्ट

declare cow a national animal says court
, गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (10:47 IST)
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलं आहे. गोहत्याबंदी कायद्यानुसार उत्तर प्रदेशातील एका आरोपीचा जामीन फेटाळत असताना कोर्टानं याबाबत भाष्य केलं.
 
गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा. तसंच गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी सरकारने संसदेत विधेयक आणावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
 
"एवढंच नाही तर गायींचं रक्षण करण्यासाठी कठोर कायदा असावा. गायीचं रक्षण करणं हे केवळ एका धर्म पंथाचं कार्य नसून गाय ही भारतीय संस्कृती आहे. जेव्हा गायीचं कल्याण होईल तेव्हा देशाच कल्याण होईल," असं मत अलाहाबाद हायकोर्टाने मांडलं आहे.
 
गोहत्या बंदी अधिनियमाअंतर्गत जावेदला अटक झाली होती. त्यावर सुनावणी करत असताना हायकोर्टाने हे मुद्दे मांडले आहेत. याप्रकरणी जावेदचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता बँक तुमच्या घरी 20000 रुपयांपर्यंत पाठवेल, या सुविधेचा लाभ कसा घ्यावा