Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

गुजरात आमदार मेवाणी विरोधात पुण्यात तक्रार दाखल

defamation case filed against
, बुधवार, 6 जून 2018 (15:00 IST)
पुण्यातील लेखिका शेफाली वैद्य यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान तसेच त्यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रमुख श्रीश्री रविशंकर यांच्यासोबतचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केल्याप्रकरणी गुजरातचे आमदार मेवाणी यांच्याविरोधात पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. 
 
मेवाणी यांनी शेफाली वैद्य, योगी आदित्यनाथ आणि श्रीश्री रविशंकर तिघांच्या फोटोची व ‘ओ माय गॉड’या चित्रपटातील एका फोटोशी तुलना करणारे आक्षेपार्ह ट्विट २९ मे रोजी केले होते. “अरेरे, यांना बघून खरंच ओ माय गॉड बोलावे लागत आहे. खूपच फिल्मी झाले आहे हे. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच हे तिघेही मोठे कलाकार आहेत. ड्रामेबाज’असे ट्विट मेवाणी यांनी केले होते. मात्र या ट्विटसोबत त्यांनी वापरलेला शेफाली यांचा योगी आदित्यनाथ व श्रीश्री यांच्या सोबतचा फोटो हा मॉर्फ केलेला होता. मेवाणी यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते ते ट्विट डिलीट केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीओ4 जी चा डाऊनलोड स्पीड कमी, ट्रायचा खुलासा