पूर्व दिल्लीच्या शाहदरा भागात काल रात्री सिलिंडरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू आणि एक जखमी झाला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यास आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठविला. अद्याप यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
दिल्लीच्या शाहदारा भागात सिलिंडरच्या स्फोटानंतर मोठी आग लागली आणि गॅसगळतीने चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना रात्री उशिरा घडली. जखमीला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, ही घटना शाहदराच्या फ्रेश मार्केट भागात घडली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फ्रेश बाजार परिसरातील भीकमसिंह कॉलनीतून एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. आग आटोक्यात आणून 5 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एलपीजी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरल्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 25 टक्के जळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.