हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत6 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुग्रामच्या पॉश भागात हिंसाचार पसरल्याने, दिल्लीने सुरक्षा वाढवली आहे आणि संवेदनशील भागांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन तैनात केले आहेत. हरियाणातील हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 26 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी 116 जणांना अटक केली आहे.
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी दिल्लीतील निर्माण विहार मेट्रो स्टेशनजवळ नूह संघर्षाच्या विरोधात निदर्शने करण्याची योजना आखल्याने राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मेवात भागातील संघर्षांविरोधात आज आंदोलन पुकारले आहे
गुरुग्राममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. गुरुग्राम पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये किंवा महत्त्व देऊ नये
हरियाणाच्या गुरुग्राम आणि शेजारच्या भागात झालेल्या जातीय संघर्षानंतर सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत गस्त वाढवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेजारच्या भागात अशा घटनांमुळे राष्ट्रीय राजधानीत उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला उत्तर देण्यासाठी दल तयार आहे. दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, दिल्लीतील सर्व संवेदनशील ठिकाणी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि आवश्यक तेथे अतिरिक्त पोलिस दलही तैनात करण्यात आले आहे.