Publish Date: Fri, 07 Jul 2017 (17:26 IST)
Updated Date: Fri, 07 Jul 2017 (17:31 IST)
पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बचावले आहेत. आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती अलिबाग येथे डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत होते. अगदी त्याच वेळेस हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ अर्थात उडण्यास सुरुवात केली. यामध्ये हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतले आहे. त्यामुळे ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले. या आगोदर लातूर येथील अपघातात ते बचावले होते. मुख्यमंत्री आता मुंबईला पोहोचले आहेत. ते सुखरूप असून खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे कार्यालयातून सांगितले आहेत.