Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

’टूलकिट' प्रकरणी दिशा रवीला अटक

’टूलकिट' प्रकरणी दिशा रवीला अटक
बंगळुरू , सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:30 IST)
समाज माध्यमांवर देशव्यापी शेतकर्यांच्या निदर्शनांबाबतची माहिती पसवणार्यार टूलकिटच्या प्रसारात सहभागी झाल्याबद्दल बंगळुरू येथील त्यांच्या घरातून 21  वर्षीय पर्यावारणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांना अटक करण्यात आली.
 
स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी हे टूलकिट वापरून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारेटि्वट केल्यानंतर तिच्यावर देशद्रोह, दोन गटांत वैमनस्य पसरवणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर गुन्ह्याखाली 4 फेब्रुवारीला गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोएटीक जस्टीस या खलिस्तान वाद्यांच्या गटाच्या सहकार्याने हे टूलकिट' बनवल्याचा पोलिसांचा आरोप होता.
 
दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप रविवारी फेटाळून लावले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी या अटकेला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. रवी ही फ्रायडे फॉर फ्युचर या संघटनेची संस्थापक असून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवीधर आहे.
 
दिल्ली पोलिसांच्या अधिकार्यासने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत या टुलकिटच्या संपादनात सहभाग असल्याचे तिने मान्य केले आहे. दिल्ली पोलिसांनी आमच्या मुलीला हिसकावून घेतल्याने आम्ही निराश आहोत. पर्यावरण बदलाबाबत जागृती करणारी तरूणी आहे. अनेक पर्यावरणवादी तरूणांच्या गटात तीचे काम सुरू असे, असे तिच कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना देशात : महाराष्ट्रात दोन दिवसातच रुग्णांच्या वाढीचे प्रमाण 5 पट, 24 तासात येथे 4 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे वाढली