आता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कंट्रोल रुममध्ये वेगळा सेटअप तयार करण्यात आला आहे. यामुळेच पोलिसांना येणारे बनावट कॉल तसेच ब्लँक कॉलवर आता नजर ठेवता येणार आहे. १०० नंबरवर मजा म्हणून फोन करणाऱ्या लोकांवर एफआयआर दाखल होणार आहे.
पोलिसांना येणाऱ्या फोनमधील सर्वात जास्त फोन हे दारूड्या लोकांचेच असतात. रात्री १० ते २ वाजेच्या सुमारास किंवा १ ते ५ वाजेपर्यंत हे फोन येत असतात. ४० टक्के फोन हे कोणीतरी चुकून किंवा मग लहान मुलांनी लावलेले असतात. तर काही लोक १०० नंबरवर फोन केल्यावर तो नक्की कोणाला लागतो किंवा मग हा पोलिसांचाच नंबर आहे ना हे तपासण्यासाठी केवळ कॉल करतात.