भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज सकाळी 10.15 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेणार आहेत. सर न्यायधीशांनी शपथ दिल्यानंतर भारताच्या नव्या राष्ट्रपतींना 11 तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्यांनतर राष्ट्रपती अभिभाषण देणार. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत करून राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विजय मिळवून देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी आहे.
सोमवारी सकाळी 10:15 च्या सुमारास संसदेच्या मध्यवर्ती कक्षात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. राष्ट्रपतींचा शपथ विधी झाल्यानंतर त्यांना 11 तोफांची सलामी दिली जाणार आहे. या समारंभाला उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व राज्याचे राज्यपाल,तिन्ही सेनादलांचे प्रमुख, विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी सर्व देशांचे राजदूतांना ही निमंत्रण देण्यात आले आहे.