कर्नाटक : कर्नाटक मधील हालामदी गावामध्ये एक भयानक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ३२ वर्षीय महिलेचे तिच्या पतीसोबत जोरदार भांडण झाल्याने तिने स्वतःच्याच मुलाला मगिरींनी भरलेल्या तलावात फेकले. यामध्ये त्या ६ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील हालामदी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ६ वर्षाच्या या मुलाला बोलायची आणि ऐकण्याची समस्या होती म्हणजे तो मूक-बधिर होता. या कारणामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. शनिवारी रात्री या दोघांमध्ये परत वाद झालेत व या लहान मुलाला घेऊन ही महिला घराबाहेर निघून गेली. डोक्यात राग असल्याने तिने आपल्या पोटच्या गोळ्यालाच मगिरींनी भरलेल्या कालव्यामध्ये फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कालवा मगरींनी भरलेल्या काली नदीला जाऊन मिळतो. पोलीस आणि फायर ब्रिगेड यांच्या टीमने सर्च ऑपरेशन सुरु केले.
रात्रभर शोधल्यानंतर देखील चिमुरड्याचा मृतदेह सापडला नाही. दुसर्यादवशी रविवारी पुन्हा शोधण्यात आले तर सर्च टीमला मगरीच्या तोंडात या चिमुरड्याचा मृतदेह मिळला. मगरीने त्याचे शरीर अर्धे खाल्ले होते. तसेच आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Edited By- Dhanashri Naik