Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 February 2025
webdunia

वाढत्या महागाईने व घटते उत्पन्न यामुळे लोकांची दुकाने आणि घरे हिरावून घेतली- राहुल गांधी

Rahul Gandhi
, शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (11:08 IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले की, घटत्या उत्पन्नामुळे आणि वाढत्या महागाईने कष्टकरी लोकांची दुकाने, घरे आणि त्यांचा स्वाभिमान हिरावून घेतला आहे. तसेच राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीतील उत्तम नगर भागातील अजित नावाच्या एक व्यक्तीच्या सलूनमध्ये गेले आणि तेथे त्यांनी दाढी केली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, "काहीच उरले नाही!" अजित यांचे  हे चार शब्द आणि त्यांचे अश्रू आज भारतातील प्रत्येक कष्टकरी गरीब आणि मध्यमवर्गाची कहाणी सांगत आहे. 

न्हावी ते मोची, कुंभार ते सुतार, घटते उत्पन्न आणि वाढत्या महागाईने हाताने काम करणाऱ्यांची दुकान, घर आणि स्वाभिमान हिरावून घेतला आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे उलटवण्याचा आणखी एक प्रयत्न, लाकडाच्या तुकड्यावर बरेली-वाराणसी एक्सप्रेस आदळली