Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आगीमुळे दिल्लीची हवा झाली विषारी!

Delhi NCR
, सोमवार, 22 एप्रिल 2024 (14:57 IST)
राजधानी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये श्वासोच्छवास, फुफ्फुस आणि त्वचेशी संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. फुफ्फुसांपासून ते अस्थमाच्या रुग्णांपर्यंत आणि वृद्ध लोकांपर्यंतच्या विविध आजारांबाबत डॉक्टर लोकांना सावध करत आहेत. या सर्व समस्यांशी झुंजण्याचे कारण दिल्लीत साचलेले कचऱ्याचे डोंगर आहे.आणि त्याला लागलेली आग आहे. या मुळे दिल्लीचे नागरिक त्रस्त आहे. या मुळे हवा दूषित राहते पण ते सर्वात धोकादायक ठरतात जेव्हा आगीतून निघणारा विषारी धूर हवेत पसरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो आणि हळूहळू मृत्यूच्या दिशेने नेतो.

दिल्लीतील गाझीपूर मध्ये आग लागल्यांनंतर पेटलेल्या कचऱ्यातून धूर निघत आहे. या धुरामुळे लोकांच्या श्वासाला धोका निर्माण झाला आहे. आग लागल्यानंतर काही तासांपासून धुराचे लोट उठत आहे. या मुळे जवळच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. कचऱ्याच्या प्रचंड डोंगरातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लोकांना घसा आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. रविवारी सायंकाळी लँडफिल साईटवर भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात व्यस्त आहे. 

राजधानी दिल्ली मध्ये प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर आहे. त्याचा प्रभाव दिल्लीतच नवे तर जवळपासच्या शहरांमध्ये देखील दिसून येत आहे. येथील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. वेळीच या वर आळा घातला नाही तर परिस्थिती फार गंभीर होऊ शकते. काही काळानंतर दिल्लीत राहणे कठीण होऊन जाईल. 

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RCB vs KKR : विराट कोहलीने विश्वविक्रम केला